डिचोली – देश-विदेशात प्रसिद्ध पावलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोव्यातील शिरगावच्या श्रीदेवी लईराईचा वार्षिक जत्राउत्सव २४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच २५ ते २८ एप्रिलदरम्यान कौलोत्सव पार पडणार आहे,अशी माहिती लईराई संस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी दिली आहे.
या जत्रेचे वैशिष्ट्य असलेले \’होमकुंड \’ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत असते. मात्र या होम कुंडासाठी कुणीही लाकडे आणू नयेत, त्याची व्यवस्था संस्थान करेल, तसेच ज्यांनी होम कुंडासाठी नवस केले असेल त्यांनी मंदिरात येऊन रितसर पावती घेऊन नवस पूर्ण करावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.यादिवशी मध्यरात्री वाजतगाजत देवीचे होम कुंडस्थळी आगमन होणार आहे.यावेळी देवीकडून होम कुंडात चनरज्योत टाकल्यावर लगेच होम कुंड पेटत असते.होमकुंड पेटल्यावर पहाटेपर्यंत हा अग्निदिव्याचा थरार चालणार आहे.