शिर्डीत १२ कोटींचा रेडा!
मुख्यमंत्र्यांनाही आकर्षण

शिर्डी – शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कार्यक्रमाच्या समारोपाला हजेरी लावली.
यंदा हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचे विशेष आकर्षक ठरला. तब्बल १२ कोटी रूपये किंमत असलेल्या या रेड्याचे आकर्षण खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निर्माण झाले. आपल्या भाषणातूनही त्यांनी या रेड्याचा उल्लेख केला आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर हा रेडा पाहण्यासाठी मुख्यमंत्री खास दालनात ते पोहचले.

१२ कोटी रुपये किंमतीचा हा मुर्‍हा जातीचा रेडा या महा पशुधन एक्स्पोत आल्याचे परिसरातील शेतकऱ्यांना माहित झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.अनेकांना या रेड्याची किंमत ऐकून विश्वासच बसत नव्हता या रेड्याचे मालक गुर्तियार सिंग यांनी सांगितले की,या रेड्याच्या वीर्यातून वर्षाला ७५ ते ८० लाख रुपये उत्पन्न मिळते.तसेच या रेड्यापासून जमलेली म्हैस २५ लीटर दूध देते. या रेड्याचे नाव इंदर असून काळा कुळकुळीत रंग लांब,भक्कम शरीरबांधा आहे.

Scroll to Top