शिवसेनेची गुढी पुन्हा फडकणार! संजय राऊत यांचा निर्धार

मुंबई :- महाराष्ट्रातील घराघरावर पुन्हा शिवसेनेची गुढी फडकवणार, असा निर्धार आज गुढीपाडव्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. आज पत्रकार परिषदेत सजंय राऊत म्हणाले, गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यात सर्वत्र आनंदाचे, चैतन्याचे वातावरण आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता दु:खी आहे. शेतकरी दु:खी आहे. नवीन वर्ष येऊनही त्यांच्या जीवनात आनंद दिसत नाही.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मात्र, या स्वाभिमानाच्या गुढीला चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून, भाजपकडून केला जात आहे. शिवसेनेवर मोगलाई पद्धतीने आक्रमण केले जात आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे पसंत पडलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता दु:खी आहे. मात्र, या नवीन वर्षात महाराष्ट्रात शिवसेनेची गुढी पुन्हा महाराष्ट्रावर फडकवणार. हाच आमचा संकल्प आहे. \’अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीने शेतकऱ्यांची पिके झोडपली आहेत. त्यामुळे नवीन वर्ष येऊनही शेतकरी आनंदी दिसत नाही. राज्य सरकारचे मंत्री केवळ दौरे आणि घोषणाबाजीत व्यस्त आहेत. गोरगरीबांना अजूनही आनंदाच्या शिधेची प्रतीक्षा आहे.\’ असल्याचे राऊतांनी म्हटले.

Scroll to Top