मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर दिग्गजांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. विशेष म्हणजे कोश्यारींची विधाने हे इतिहासाचे विश्लेषण असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण केले की, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मराठी माणसाबद्दल केलेली कथित वादग्रस्त विधाने ही अॅट्रॉसिटी (अत्याचार प्रतिबंधक) कायदा वा अन्य कुठल्याही फौजदारी कायद्याखाली गुन्हा ठरत नाहीत. कोश्यारी, त्रिवेदींची विधाने इतिहासाचे विश्लेषण असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने कारवाईसाठी पोलिसांना निर्देश देण्यास
नकार दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोश्यारी यांना टीकेचा सामना करावा लागला होता, तर त्रिवेदी यांनी सांगितले होते की, मराठा साम्राज्याच्या संस्थापकाने मुघल सम्राट औरंगजेबची माफी मागितली होती. यासंदर्भात 20 मार्च रोजी पनवेल येथील रहिवासी रामा कटारनवरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि अभय वाघवसे यांनी ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेली वादग्रस्त विधाने ही अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींचा विचार करता सरळसरळ गुन्हा ठरतात. मात्र उच्च न्यायालयाने त्या तरतुदींकडे दुर्लक्ष करीत दिलेला निर्णय बेकायदा आहे. या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, अशी प्रतिक्रिया
याचिकाकर्त्यांनी दिली.
शिवाजी महाराजांवरील टिप्पणी