शेअर बाजारात सलगतिसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९४ अंकांनी घसरून ८१,००६ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२१ अंकांच्या घसरणीसह २४,७४९ अंकांवर बंद झाला.देशांतर्गत शेअर बाजारासाठी घसरणीचा हा सलग तिसरा आठवडा ठरला. आज निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचे दोन प्रमुख निर्देशांक जवळपास दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरले.बँक निफ्टी ५१२ अंकांनी घसरून ५१,२८८ अंकांवर बंद झाला.

Share:

More Posts