शेअर बाजार नव्या उच्चांकावर सेन्सेक्स ६६,५८९ अंकांवर

मुंबई –
अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम देण्याची शक्यता आणि आयटी शेअरमधील तेजीच्या जोरावर शेअर बाजारच्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आज नवा उच्चांक नोंदवला. आज सेन्सेक्स ५२९ अंकांच्या वाढीसह ६६,५८९ वर तर निफ्टी १५५ अंकांनी वाढून १९,७२१ वर बंद झाला. सेन्सेक्सवर एसबीआय, विप्रो, रिलायन्स, एचडीएफसी बँक, कोटक बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय, मारुती, एशियन पेंट्स, मारुती, ॲक्सिस बँक हे शेअर्स वाढले. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, जेएसडब्लू स्टील, एम अँड एम, टीसीएस हे शेअर्स घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top