मुंबई- गुढीपाडव्यानिमित्ताने आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक काहीसे वधारले. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सकारात्मक बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज 139 अंकांनी वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 44 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.24 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,214 अंकावर पोहोचला. निफ्टीमध्ये आज 0.26 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,151 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 104 अंकांची वाढ होऊन तो 39,999 अंकांवर पोहोचला.
आज एकूण 1993 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1421 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 128 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये आज काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आज 0.5 टक्क्यांची वाढ झाली.