शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगा! जाहिरातींवरून अजित पवारांची टीका

जालना- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. विधानपरिषद आणि कसब्यातील पराभवानंतर शिंदे फडणवीस धास्तावले असून, त्यामुळेच हजारो कोटी रुपयांचा खर्च करून सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. \’या सरकारचा एकच धंदा सुरु असून, सगळीकडे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान लावण्यात येत आहे. काय गतिमान, त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांची दातखीळ बसते,\’ असा खोचक टोला अजित पवारांनी सरकारला लगावला आहे. अजित पवार आज जालना दौऱ्यावर असून, यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

याचे सरकार येऊन नऊ महिने झाले. त्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या. त्यात कशीबशी एक जागा आली. ती सुद्धा शिवसेनेचा उमेदवार घेतल्यामुळे मिळाली. बाकी सगळीकडे त्यांचा पराभव झाला असल्याने यांचे डोळे उघडले असल्याचा टोला अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

Scroll to Top