\’श्री अन्न\’ देशात विकासाचे माध्यम! ग्लोबल मिलेट्स संमेलनात मोदींचे विधान

नवी दिल्ली- \’\’जिथे \’श्री\’ असतो तिथे समृद्धी देखील असते तसेच संपूर्णता देखील असते. \’श्री अन्न\’ देखील भारतात संपूर्ण विकासाचे माध्यम बनत असून गाव आणि गरीब देखील त्यात जोडले जात आहेत,\’\’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन इन्स्टिट्यूटच्या (आयएआरआय) परिसरात आयोजित ग्लोबल मिलेट्स संमेलनाच्या उद्घाटना वेळी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल मिलेट्स संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय भरडधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी) वर्षानिमित्त एक पोस्टाचे तिकीट आणि विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यांनी या संमेलनासह प्रदर्शनाचे देखील उद्घाटन केले. या दोन दिवसीय संमेलनात १०० पेक्षा अधिक देशांचे कृषी मंत्री व भरडधान्य संशोधक उपस्थित होते.

Scroll to Top