संकष्टीनिमित्त दगडूशेठ गणपतीला
दोन हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवण्यात आला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली.

Scroll to Top