संजय राऊतांचे हक्कभंग नोटीशीला उत्तर! वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा

मुंबई:- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे विधिमंडळ हे ‘चोर’मंडळ आहे असे विधान केले होते. राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत तो मंजूर करण्यात आल्यानंतर नोटीस पाठवण्यात आली होती. या हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊतांनी पत्रात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला दावा केला आहे. विधीमंडळाला चोर म्हटले नाही, एका विशिष्ट गटाला चोर म्हटले असे पत्रात नमूद केले आहे.

संजय राऊत म्हणतात,”मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केले नसून हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरते होते. विधिमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेले वक्तव्य तपासून पाहावे”.

कोल्हापूर दौऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ घालण्यात आला होता. संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर हक्कभंग समितीने राऊत यांना नोटीस पाठवली होती. या हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

Scroll to Top