मुंबई – ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत आज न्यायालयात हजर नसल्याने शिवडी न्यायालयाकडून एक हजार रुपये दंड त्यांना लगावण्यात आला. संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर न राहिल्याने हा दंड लगावण्यात आला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र सामना वृत्तपत्रात १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्या असल्याचे म्हटले होते. यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या वकिलांकडून आज न्यायालयीन कामकाजात गैरहजर राहण्याचा अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो मान्य न करता हजार रुपयांचा दंड ठोठावला. या याचिकेवर पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
संजय राऊतांना कोर्टाकडून
एक हजार रुपयांचा दंड
