छत्रपती संभाजीनगर- रामनवमी आणि रमजानचा रोजा सुरू असतानाच काल छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडपुरा भागात राम मंदिरासमोरील परिसरात धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून दोन धार्मिक गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. पोलीस जीपसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही या जमावाने टार्गेट केले. मौलवींनी शांततेचे आवाहन केल्यावर आज रामनवमीच्या दिवशी या भागात तणावपूर्ण शांतता होती. हा राडा मुद्दाम घडवून आणला असा आरोप संजय राऊत आणि चंद्रकांत खैरेंनी केला तर नेते स्वत:च्या स्वार्थासाठी अशी वक्तव्ये करीत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या राड्यानंतर शहरातील पोलीस सतर्क झाले असून, पोलिसांनी तपासासाठी 10 पथके तैनात केली आहेत. सर्वत्र झाडाझडती सुरू असून, एकाला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. शहरात 3500 पोलिसांचा ताफा तैनात केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. या दंगलसदृश परिस्थितीत दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक करत त्यांची वाहनेही पेटवून दिली. या राड्यात तब्बल 20 वाहने जाळण्यात आली आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज द्वारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. या घटनेवर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, रात्री साडेबाराच्या सुमारास दोन गटात किरकोळ भांडण झाले होते. मोटरसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची, धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही लोक गोळा झाले. त्यांनी घोषणाबाजी केली. नंतर समाजकंटक गोळा झाले त्यांनी उपद्रव सुरू केला. पोलीस घटनास्थळी जमाव पांगवण्यासाठी आले असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला, पण जमाव अधिक होता. या जमावाने पोलिसांच्या गाड्या जाळल्या. त्यामुळे आम्ही अधिक कुमक आणून बलप्रयोग करून जमाव पांगवला.
दरम्यान, आता या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, भाजप आणि एमआयएम हे येथील लोकांच्या मनात विष पेरत आहेत. परवानगी नसताना मोर्चा काढायचा तुम्ही, स्वत: त्या मोर्चात सामील व्हायचे तुम्ही आणि दोष आम्हाला देणार का? संजय राऊत म्हणाले की, मी आधीपासूनच सांगत आहे की, इथे काहीतरी काढून परिस्थिती बिघडवली जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले, ‘संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही लोक या ठिकाणी भडकावू प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे. यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजावून घ्यावे. कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नये ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांना करावा लागेल. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे या राड्यानंतर राम मंदिरात उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेक नेत्यांनी आरोप केले आहेत. मात्र त्यांनी खुलासा देताना म्हटले की, ‘या राड्यात राम मंदिराला कोणतीही इजा होऊ नये म्हणून मी तेथे गेलो होतो. यावेळी तेथे दंगा करणारी, जाळपोळ करणारी मुले ही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यांनी नशा केली होती. ती कोणाच्याच नियंत्रणात नव्हती. माझ्यावरही त्यांनी हल्ला चढवला. त्यांची चौकशी करावी.\’
दरम्यान, या राड्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे, शिवसेना नेते प्रदीप जैस्वाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दंगेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. आमदार जैस्वाल म्हणाले, ‘राम मंदिराच्या समोर काही समाजकंटकांनी दगडफेक केली, पण मंदिराच्या कोणत्याही भागात एकही दगड आला नाही, पण अशा पद्धतीची दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे.\’ सावे म्हणाले,‘मी जनतेला विनंती करू इच्छितो की, उत्सव उत्साहात साजरा करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.\’
पोलिसांनी पहाटे पहाटेच जळालेल्या गाड्या घटनास्थळावरून हटवल्या. रस्ता धुवून काढण्यात आला. या परिसरात पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान सुरू आहे आणि आज रामनवमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरातील संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
संभाजीनगरात राममंदिरासमोरच