संविधान हत्या दिनाविरोधात याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. समीर मलिक नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती.

१९७५ मध्ये देशात पुकारलेली आणीबाणी ही घटनेच्या कलम ३५२ नुसार लागू करण्यात आली होती. त्यामुळे ही संविधानाची हत्या आहे असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. याच आशयाची एक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळताना म्हटले आहे की, सरकारने जारी केलेली अधिसूचना कलम ३५२ अंतर्गत आणीबाणीच्या घोषणेच्या विरोधात नसून अधिकाराचा दुरुपयोग आणि घटनात्मक तरतुदींच्या विरोधात असल्यामुळे ही अधिसूचना संविधानाचे उल्लंघन किंवा अनादर करत नाही.