सत्ता जाताच जगनमोहन रेड्डींच्या घराजवळील बांधकामावर बुलडोझर

हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिकेने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचे बेकायदेशीर बांधकाम बुलडोझरद्वारे जमीनदोस्त केले. लोटस पॉण्ड येथील जगन मोहन रेड्डी यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या सुरक्षेसाठी फुटपाथवर ३ खोल्या बांधल्या होत्या. त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
याबाबत महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. जगनमोहन रेड्डी यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्याच्या कडेला खोली बांधण्यात आली होती. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांचा पराभव झाला. त्यांची सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरक्षासुद्धा हटवली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top