सत्येंद्र जैन यांचा एकटेपणा बराकीत दोन कैदी तैनात

नवी दिल्ली – आप पक्षाचे अटकेत असलेले मंत्री यांची तिहार जेलमध्ये विशेष बडदास्त ठेवण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत . त्यांना बराकीत दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल आतापर्यंत अनेकवेळा तक्रारी झाल्या आणि कारवाईही झाली , पण हे प्रकार थांबत नाहीत . आता सत्येंद्र जैन यांनी जेल अधीक्षकांना पत्र लिहिले आणि मागणी केली की मला बराकीत एकटेपणा जाणवत असल्याने माझ्या बराकीत दोन कैदी सोबतीला पाठवा . त्यांची ही मागणी लगेच मान्य करून दोन कैदी पाठवण्यात आले , पण याबाबत तक्रार झाल्यावर या प्रकाराची चौकशी सुरू झाली असून कैद्यांना त्यांच्या मूळ बराकीत परत पाठवण्यात आले आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top