मुंबई- शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:चे शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे सरवणकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द केला जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली.
गणेश विसर्जनाच्या दिवशी दादर पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेला गोळीबार सरवणकर यांच्याच बंदुकीतून झाला होता. या गोळीबाराचा दूसरा बॅलेस्टिक अहवाल आला आहे. यानंतर सरवणकरांवर कारवाई करत त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.