सदा सरवणकरांना पोलिसांची क्लिन चीट! बंदूक त्यांचीच पण गोळी त्यांनी झाडली नाही

मुंबई : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळी झाडली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. गणेशोत्सवात दरम्यान ही घटना घडली होती. गणेश विसर्जनदरम्यानचा हा प्रकार आहे. महत्त्वाचे म्हणजे, बंदूक सदा सरवणकरांचीच होती. मात्र गोळी अन्य व्यक्तीने झाडली, असे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहिर म्हणाले, आता हे किती हास्यास्पद आहे. सर्वांनी टिव्हीवर पाहिले एखाद्याचे शस्त्र दुसऱ्याकडे आले तरी तो कायद्याने गुन्हा आहे. मग हा गोळीबार केला कुणी? शासन कोणाचेही असो, आपण मुंबईत राहतो. मुंबईची कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांची विश्वासार्हता, अशा गोष्टींमुळे ढासळून जाईल की काय, हा प्रश्न निर्माण होणार आहे. ज्यांनी हे केले त्यांना चौकशीसाठी तरी बोलवा. पण अशा गोष्टी न करता, अशा प्रकारचे रिपोर्ट आणून, सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे.
सरवणकरांनी म्हणाले, ‘हे प्रकरण घडले होते, तेव्हा केवळ राजकारण झाले होते. पोलिसांनी घटना पाहिली होती. सत्य बाहेर येतेच.’

Scroll to Top