मुंबई – आर्यन खान ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची आजही सीबीआय चौकशी झाली . काल त्यांची दोन सत्रात पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज रविवारी पुन्हा चौकशी करण्यात आली.
समीर वानखेडे यांना उद्यापर्यंत न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे . त्यामुळे उद्या सीबीआय काय युक्तीवाद करते हे महत्वाचे ठरणार आहे . त्याच दृष्टीने खास दिल्लीहून मुंबईत आलेले आठ जणांचे सीबीआयचे पथक सतत दोन दिवस वानखेडे यांची चौकशी करीत आहे . आपण चौकशीत सीबीआयला पूर्ण सहकार्य करीत आहोत असे वानखेडे यांनी सांगितले आहे . यापूर्वी शाहरुख खान आणि वानखेडे यांच्यातील व्हाट्सअप चॅट न्यायालयात सादर झाले आहेत . त्याचवेळी एनसीबी कार्यालयात आर्यन खानची जी चौकशी झाली त्याचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे . या प्रकरणाची चौकशी १९ महिन्यानंतर पुन्हा सुरू झाली असून चौकशीला कोणते वळण लागते याची उत्सुकता आहे .