मुंबई – आर्यन खान ड्रग्जप्रकरणी केंद्रीय तपास एजन्सीने सोमवारी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना समन्स बजावले आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना गुरुवारी 18 मे रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
सीबीआयने समीर वानखेडे यांचा फोन जप्त करून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. वानखेडे यांच्या वैयक्तिक मोबाईल फोनमधील डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचादेखील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सीबीआय तपास यंत्रणेने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत काही गंभीर आरोप केले. आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा वानखेडेंवर आरोप आहे.
समीर वानखेडे यांना सीबीआयचा समन्स
