बुलढाणा
समृद्धी महामार्गवर आज कारचा भीषण अपघात झाला. बुलढाणा येथील देऊळगाव कोळ गावाजवळ ही घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास कोळ येथे पोहोचली असता कार इम्पॅक्ट बॅरियरला जोरात धडकली. या धडकेनंतर कारने पेट घेतला. यावेळी २ जणांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा प्रवासी उपचारा दरम्यान मृत्यूमुखी पडला. तो मध्यप्रदेशातील शजापुर येथील रहिवासी होता. दिनेश भीलाला असे त्याचे नाव होते.
या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघातात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्याअनुषंगाने पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.