सरकारचे फूड डिलिव्हरी अ‍ॅपस्विगी-झोमॅटोला टक्कर देणार

नवी दिल्ली:

झोमॅटो, फूड पांडा, उबर इट्स आणि स्विगीसारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या भारतात प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. भारत सरकार देखील आपले फूड डिलिव्हरी अ‍ॅप लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारत सरकारने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सचा (ओएनडीसी) पर्याय आणला आहे. या अ‍ॅपमुळे रेस्टॉरंट मालक जेवण ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतात. याचबरोबर ओएनडीसीच्या माध्यमातून किराणा सामान, होम डेकॉर साहित्य, साफसफाईच्या आवश्यक गोष्टीदेखील घरपोच मिळू शकणार आहे. भारत सरकारचे फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगी-झोमॅटोला टक्कर देणार.

ओएनडीसी सेवा २०२२ सप्टेंबर पासून कार्यरत आहे. आता या सेवेला लोकप्रियता मिळत आहे. एका अहवालानुसार या प्लॅटफॉर्मने 10 हजार दैनंदिन ऑर्डरचा टप्पा ओलांडला आहे. मागील काही दिवसांपासून नागरिक ओएनडीसीचा वापर करत आहेत. ओएनडीसी आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे डिलिव्हरी मिळालेल्या खाद्यपदार्थांच्या किंमतींची तुलना करणारे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ओएनडीसीद्वारे वितरित केलेल्या खाद्यपदार्थांची आणि इतर वस्तूंची किंमत इतर डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या तुलनेने कमी आहे. भारत सरकारच्या ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ या विभागाकडे ओएनडीसीची मालकी आहे. सरकारच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी या उपक्रमाचा विस्तार सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top