अहमदनगर – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेने अकोले ते लोणी असा लॉंग मार्च सुरू केला होता. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेत सरकारच्या वतीने सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई आदी मागण्यांसाठी भारतीय किसान महासभेने अकोले ते वणी दरम्यान लॉंग मार्चचे आयोजन केले होते. या लॉंग मार्चमध्ये हजारो शेतकरी सामील झाले होते. आज मोर्चाचा दुसरा दिवस होता. मात्र शेतकऱ्यांचे हे लाल वादळ वणीला धडकण्यापूर्वीच, सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले. शेतकरी नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात दोन तास चर्चा झाली. या बैठकीला कामगार मंत्री सुरेश खाडे लआणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत हेसुद्धा उपस्थित होते . या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यानावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे सरकारने आश्वासन दिले. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सतत संपर्कात होतो. त्यांच्याशी चर्चा करीत होतो. आम्ही आज शेतकरी शिस्टमंडळाचे म्हणणे एकूण घेतले. ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असे त्यांना आश्वासन दिले. त्याला शेतकरी नेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीनंतर मोर्चा स्थगित करीत असल्याचे अजित नवले यांनी जाहीर केले.