वेलिंग्टन : २०२० मध्ये सुरक्षेच्यादृष्टीने टिकटॉक या चिनी ऍपवर भारतात बंदी घालण्यात आली. त्यानंतर अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली तर आता न्यूझीलंडने खासदारांसह संसदेतील इतर कर्मचाऱ्यांच्या अधिकृत फोनवर टिकटॉक ऍप ठेवण्यास बंदी घातली आहे. तर ब्रिटननेमध्येही टिकटॉक वर बंदी घातली आहे.
टिकटॉकवरील ही बंदी न्यूझीलंडच्या संसदीय विभागातील सुमारे ५०० लोकांना लागू होणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी याची घोषणा केली. सरकारी कर्मचारी वर्गाला फोनवर टिकटॉक ऍप वापरण्यास बंदी घातली आहे. टिकटॉक ही चीनची कंपनी आहे. ती वापरकर्त्यांचा ब्राउझिंग इतिहास, स्थान आणि बायोमेट्रिक आयडी चीनी सरकारसोबत शेअर करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे टिकटॉक या ऍपवर बऱ्याच दिवसांपासून गोंधळ आणि संशय व्यक्त केला जात असताना एफबीआयसारख्या इतर अनेक एजन्सीने याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.