सर्वांधिक पावसाच्या चेरापुंजीत ५० रुपयांत एक बादली पाणी

चेरापुंजी – जगातील सर्वाधिक ११८७३ मिलिमीटर पावसाचा जागतिक विक्रम मेघालयातील चेरापुंजीच्या नावावर आहे. चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या स्थळांमध्ये समाविष्ट आहे. मात्र याच चेरापुंजीमधील जवळपास २० लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. याठिकाणी २० लिटरची पाण्याची बादली विकत घेण्यासाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत.

चेरापुंजीत ३० वर्षांपासून असलेल्या सरकारी जलवाहिनीचे पाणी कोळसा खाणीमार्गे येत असल्याने ते दूषित झाले आहे. त्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. हे ठिकाण डोंगरावर असल्याने पावसाचे पाणी डोंगरातून वाहून जाते. इथल्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय उमेदवार पाणीसमस्या सोडवण्याचे आश्वासन देतात, तरीही चेरापुंजी तहानलेली आहे. मात्र निवडणूक संपली की आश्वासन हवेत विरते. याठिकाणी येणारे पर्यटकही काही तासच इथे राहून परत शिलाँगला जातात. कारण इथे पुरेसे पाणी मिळत नाही. पठारी प्रदेश असल्याने लागवडीयोग्य जमीन फारच कमी आहे. त्यामुळे बरेच लोक उदरनिर्वाहासाठी शिलाँग आणि गुवाहाटी येथे जात असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top