\’सलमान खानला आम्ही जीवे मारणार\’
गँगस्टर बिष्णोईची तुरुंगातून धमकी

मुंबई – पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाची गेल्यावर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने सलमान खानला जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. विशेष म्हणजे बिष्णोईने तुरुंगातून ही धमकी दिली आहे. तुरुंगातूनच त्याने एका वाहिनीला मुलाखत देत अनेक धक्कादायक खुलासे केले.

\’आमच्या संपूर्ण समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. तो नेहमी आमच्या समाजाला कमी लेखतो. माझ्या समाजात प्राणी आणि झाडांचा जीव घेण्यास सक्त मनाई आहे. त्यांना आम्ही कधीही ईजा पोहोचवत नाही. मात्र, सलमानने आमच्या इथे येऊन काळवीटाची शिकार केली. त्याच्यावर केस सुरु असूनही त्याने अजून आमच्या समाजाची माफी मागितलेली नाही. मी लहान असल्यापासून माझा त्याच्यावर प्रचंड राग आहे,\’ असे बिष्णोईने या मुलाखतीत सांगितले.

\’मला त्याचा गर्व मोडायचा आहे. त्याने आमच्या लोकांना पैशांचे आमिष दिले. सलमानने आमच्या मंदिरात येऊन माफी मागायला हवी. माझ्या समाजाने त्याला माफ केल्यास, माझा त्याच्याशी काहीही संबंध राहणार नाही. कोणत्याही लोकप्रियतेसाठी नाही ठोस कारणामुळे आम्ही त्याला मारणार आहोत,\’ असा खळबळजनक दावा लॉरेन्सने केला. तसेच सलमानला धमकीचे पत्र तू लिहिले होते का, असे विचारले असता त्याने नाही असे उत्तर दिले. \’आम्ही त्याला पत्र लिहून नव्हे, तर थेट जाऊन उत्तर देणार असल्याचे, विधान त्याने केले.

Scroll to Top