सांगली – शिराळा तालुक्याच्या वारणावतीतील वनविभागाच्या वन्यजीव कार्यालयाशेजारी असलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या आगीत वनविभागाच्या ताब्यातील लाखो रुपयांच्या (नरक्या) औषधी वनस्पतीसह दोन ट्रक देखील जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने कोणतीच जिवीतहानी झाले नाही.
नरक्या वनस्पतीचा कॅन्सरच्या उपचारासाठी बनवल्या जाणाऱ्या औषधांमध्ये वापर होत असतो. 15 ते 20 वर्षांपूर्वी येथे नरक्या तस्करीचे प्रकरण उघड झाले होते. यात नरक्या वनस्पतीच्या तीन ट्रक जप्त करण्यात आले होते. जप्त केलेला हा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या शेजारील गोदामात ठेवण्यात आला होता. नरक्याचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच या गोदामाला काल आग लागली. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. वन्यजीव विभागाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर झाले नव्हते. आज सकाळी या आगीवर कशीबशी नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत गोदामातील नरक्या वनस्पती जळून खाक झाली होती.
सांगलीत वनविभागाच्या