मुंबई:
राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला आहे, तर दुसरीकडे काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. साेमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे सातारा, साेलापूर, काेल्हापूर या भागाला अवकाळी पावसाने झाेपडले. मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र शेतीचे नुकसान झाले आहे.
दरम्यान वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूरातल्या हलोंडी येथील एका लॉनमधील लोखंडी लग्नमंडप कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. एका लाॅनमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमावेळी वादळी वारे सुटले होते. वा-याचा वेग खूप माेठा हाेता. त्यामुळे हा मंडप काेसळला. त्यात काही जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साेलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव परिसरातील पिंपरी, साकत, हिंगणी, जामगाव, महागाव, उपळे याठिकाणी आज सकाळपासून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.