मुंबई – यंदा सायन तलावात फक्त ४ फुट उंचीच्याच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.चार फुटांवरील गणेशमूर्तींचे दादर,माहीम आणि गिरगाव चौपाटी याठिकाणी विसर्जन करावे असे आवाहन पालिकेच्या एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी गणेश भक्तांना केले आहे.
सायन येथील एन.एस.
मंकीकर मार्गाजवळ असलेल्या या तलावाची खोली कमी आहे.मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन केल्यास मूर्तीचे विघटन होणार नाही.तसेच याठिकाणी कासव आणि मासे आदींचे वास्तव्य आढळते.त्यामुळे खबरदारी म्हणून केवळ चार फुट उंचीच्याच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.तलाव परिसरात त्यासंदर्भातील फलक लावण्यात आले आहेत.गणेश मंडळांनाही आगाऊ सूचना देण्यात आल्या आहेत.