सावंतवाडी- तळवडे आंबाडेवाडी येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने शुक्रवार ४ ऑक्टोबर ते बुधवार ९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या नवरात्र सोहळ्यात शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी भजने व फुगडी दांडियाचा कार्यक्रम तर शनिवार ५ ऑक्टोबर रोजी स्वरसंध्या भावगीत बहारदार कार्यक्रम व फुगडी दांडिया, रविवार ६ ऑक्टोबर रोजी जयभक्तांचा डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे सोमवार ७ ऑक्टोबर रोजी चेंदवण दशावतार नाट्य मंडळाचे ट्रिकसीन नाटक ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ तर मंगळवार ८ऑक्टोबरला ट्रिकसीन नाटक ‘व्यंकट पद्मावती’ आणि बुधवार ९ ऑक्टोबर रोजी ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘भैरीभवानी’ हा नाट्ययोग होणार आहे.तरी या संपूर्ण नवरात्रोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ राजाराम गावडे यांनी केले आहे.