सावंतवाडी- दैनिक ‘नवाकाळ’ सहप्रायोजक असलेली सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनने आयोजित केलेली कै. सूर्यकांत पेडणेकर स्मृती चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा रविवारी संपन्न होऊन प्रतिक बांदेकर विजेता ठरला. 64 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
प्रथम क्रमांक प्रतिक बांदेकर, द्वितीय अनिल तायशेटे, त्यानंतर रफिक शेख, नेव्हिस दोंतास, सचिन घाडी, गौतम यादव, तात्मुल मकानदार आणि अवधूत लाड हे पहिल्या आठ स्थानांवर विजयी झाले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष शांताराम गोसावी, नंदू शिरोडकर, दिलीप वाडकर, शुक्राचार्य म्हाडेश्वर, प्रविण भोगटे, लक्ष्मीकांत पेडणेकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम स्पर्धा! प्रतिक बांदेकर विजेता
