सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतुकीस१० जूनपर्यंत मुदतवाढ द्या!

सिंधुदुर्ग –

मालवण सागरी हवामान असल्याने जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतुकीस १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण यांच्या वतीने बंदर विभाग मालवण व प्रादेशिक बंदर अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली आहे.
पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा आचरेकर, दामोदर तोडणकर, रुपेश मसुरकर यासह अन्य पर्यटन व्यावसायिकांच्या उपस्थितीत बंदर विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दरवर्षी १० जूनपर्यंत सागरी पर्यटनासाठी देशविदेशातील पर्यटक जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर भेट देतात. हा काळ जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचा असून सागरी पर्यटनामुळे संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे सध्यस्थितीत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वातावरणाचा विचार करता २६ मे ते ३१ मे पहिल्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी व सागरी हवामान चांगले असल्यास १ जून ते १ जूनपर्यंत दुसऱ्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी. जिल्ह्यात पावसाळा १० जूननंतर सरासरी सक्रिय होत असतो. या पूर्वीही आपल्या माध्यमातून सागरी पर्यटनासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top