सिद्धूच्या सुटकेची तारीख निश्चित! लवकरच येणार तुरुंगातुन बाहेर

चंदिगढ :रोड रेज प्रकरणी तुरुंगात असलेले पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची १ एप्रिल रोजी पतियाला तुरुंगातून सुटका होणार आहे. अशी माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. तर तत्पूर्वी शुक्रवारी त्यांची पत्नी डॉ.नवज्योत कौर सिद्धू यांनी एक भावनिक ट्विट केले आहे. नवज्योत सिद्धू यांची आठवण काढत त्यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. सिद्धू यांना धडा शिकवण्यासाठी मी देवाकडे मृत्यू मागितला आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची १ एप्रिल रोजी पटियाला तुरुंगातून सुटका होऊ शकते. सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, पंजाब सरकारने यासंदर्भात औपचारिक माहिती दिलेली नाही. सध्या कैद्यांच्या सुटकेसाठी बैठकांची फेरी सुरू आहे. दरम्यान, संबंधित शेअर केलेल्या माहितीच्या आधारे सिद्धू यांनी ही माहिती पोस्ट केली आहे. १९९० च्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर ते २० मे २०२२ पासून पटियाला जेलमध्ये आहे.

तर दुसरीकडे रोड रेज प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ.नवज्योत कौर सिद्धू या स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्या या आजाराच्या स्टेज-२मध्ये आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. याबाबतची माहितीही त्यांनी ट्विट करून दिली होती. १ एप्रिलपर्यंत सिद्धूची तुरुंगातून सुटका होऊ शकते, असे डॉ. सिद्धू यांनी सांगितले होते. तत्पूर्वी कौर यांनी ट्विट करत लिहिले की, सिद्धूने केलेल्या गुन्ह्यासाठी ते शिक्षा भोगत आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना क्षमा करा. आपल्या सुटकेची वाट पाहत दररोज बाहेर राहणे खूप वेदनादायक आहे. नेहमीप्रमाणे मी तुझे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा न्याय नाकारला जात आहे. पण सत्य खूप सामर्थ्यवान आहे, परंतु क्षमस्व आता तुमची वाट पाहू शकत नाही कारण भयंकर वेदना आहेत. कर्करोग स्टेज टू मध्ये आहे. यासाठी कोणालाही दोष देता येणार नाही, कारण ही देवाची इच्छा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Scroll to Top