दिल्ली
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकरणात आज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांना 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. सध्या मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया 22 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.
सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात आज हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयने म्हटले आहे की, ‘तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्वाचा टप्प्यावर आहे. त्यामुळे त्यांची सीबीआय कोठडी वाढवावी`. मात्र युक्तीवाद ऐकल्यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआयप्रकरणी सिसोदियांची 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सिसोदियांना 3 एप्रिलपर्यंत