सीईटी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई -औषध निर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा येत्या ९ पासून विविध सत्रात होत आहे. या परीक्षेची प्रवेश पत्रे सीईटी सेलने संकेतस्थळावर उपलब्ध केली आहेत.

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे.६ लाख १९ हजार ०३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी २ लाख ९५ हजार ८४४ आणि पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख २३ हजार १८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.तारीख आणि वेळ प्रवेशपत्रावर परीक्षा कालावधीत विविध सत्रांत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करून तारीख आणि सत्र वेळांची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी,प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक,वेळ,परीक्षा केंद्राचा पत्ता आदी बाबी वाचून घेण्याच्या सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत. पीसीएम ग्रुपसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ मेपासून सुरू होणार असून १३ मे रोजी संपणार आहे. तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ मेपासून सुरू होणार असून, २० मे रोजी संपणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आले आहे. प्रवेशपत्राबरोबरच स्वतःच्या मूळ ओळख प्रमाणपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड,पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून आणणे बंधनकारक असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top