सीएसएमटीत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवा! ठाकरे गटाचे आंदोलन

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर बसवा, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. सीएसएमटी परिसरात महाराजांचा पुतळा बसवण्यास रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई केली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.
३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सीएसएमटी परिसरात एकत्र जमले होते. त्यावेळी आंदोलनास्थळी उभारलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा, असा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. अरविंद सावंत म्हणाले की, सीएसएमटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी मागणी शिवसेनेकडून अनेकदा करण्यात आली होती. त्यासाठी पत्रव्यवहारदेखील केला आहे. परिसरात महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मान्यदेखील झाला होता. हा पुतळा बनवून तयार आहे. परंतु प्रशासनाकडून पुतळा बसण्यास दिरंगाई केली जात आहे. या पुतळ्याच लोकार्पण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top