दमास्कस –
सीरियाची राजधानी दमास्कस येथे गुरुवारी टॅक्सीमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. २३ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा स्फोट एवढा भीषण होता की, जवळच्या टॅक्सीचे तुकडे झाले. आजूबाजूच्या दुकानांच्या काचा फुटल्या. आशुरा या पवित्र एकाच्या दिवस आधी शिया मशिदीजवळ हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की “आम्ही एक मोठा स्फोट ऐकला आणि लोक पळू लागले, त्यानंतर रुग्णवाहिका आल्या आणि सुरक्षा दल परिसरात पोहचले.