पुणे -पुण्यातील जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सुजित पाटकरांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.उद्धव ठाकरे आणि लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्यांनी पोलिसांकडे केली. सोमय्या म्हणाले, ‘या सेंटरमध्ये कोरोना काळात घोटाळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजीनगरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.’
सुजित पाटकरांविरोधात सोमय्या यांची तक्रार
