*ओमर अब्दुल्ला यांची टीका
श्रीनगर – केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची घोषणा करणे अपेक्षित असताना सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ही लज्जास्पद बाब असल्याची घणाघाती टीका जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी असेही म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरचे केंद्र सरकारने रद्द केलेले ३७० कलम हे या राज्याच्या सर्व समस्यांचे मूळ नव्हतेच. सध्या जिथे दहशतवादी हल्ले होत आहेत. त्याठिकाणी पूर्वी असे हल्ले झाले नव्हते. विशेष म्हणजे जम्मू, राजौरी व पूँछ या भागात पूर्वीच्या सरकारच्या काळापेक्षा आताच्या राजवटीत काश्मिरी पंडित मोठ्या संख्येने मारले जात आहेत.काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर सातत्याने होत आहेत. पूर्वी ज्या काश्मिरी पंडितांना खोऱ्यात नोकरी देऊन वसवले होते.आता जीवाच्या भीतीने अधिकाधिक काश्मिरी पंडित हे काश्मीर खोरे सोडत आहेत, असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.