सोने- चांदीच्या दरात पुन्हा वाढ
२४ कॅरेट सोने ५६,५९९ रुपये

मुंबई – लग्नसराईच्या दिवसात सोने- चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर (एमसीए) सोन्याच्या किंमतीत ४४९ रुपयांची वाढ झाली. त्यानुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ५६,५९९ रुपये झाला आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत ७५० रुपयांची वाढ होऊन प्रति किलो ६३,६४० रुपये झाली आहे.

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. तर, पुढील ५ वर्षांत प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजारांवर जाऊन पोहोचेल, असा अंदाज क्‍वाड्रिगा इग्नियो फंडने वर्तवला. दरम्यान, नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र, २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते आणि २ टक्के इतर धातू वापरले जातात, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

Scroll to Top