सोमय्या आरटीआय कार्यकर्ते! सुषमा अंधारेंची टीका

पुणे :- महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आगपाखड केली आहे. किरीट सोमय्या अंशकालिन लोकप्रतिनिधी आणि पूर्णवेळ भाजपचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, असे सुषमा अंधारे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

भाजपकडे ब्लॅकचे व्हाईट करणारे यंत्र आहे का? ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते भाजपमध्ये गेल्यानंतर व्हाईट होऊन जातात, असेही अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी कोणावर किती आणि कसे आरोप केले याचाही पाढा वाचला. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी २२ पत्रकार परिषदा घेतल्या, ५५ ट्विट केले. आनंद अडसूळ यांच्यावरील आरोपासंबंधी ६ पत्रकार परिषदा घेतल्या, २० ट्विट केले. भावना गवळींच्या विरोधात ८ पत्रकार परिषदा घेतल्या आणि २२४ ट्विट केले. अनिल परब यांच्यावर आरोप करताना ११ वेळा ते खेड, दोपोलीला गेले. किरीट सोमय्या कोण आहेत, जे तिथे हातोडा घेऊन गेले. ते ईडीचे कर्मचारी आहेत का, असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.

Scroll to Top