सोमाटणे टोल नाका हटवण्यासाठी आंदोलन

तळेगाव- जुन्या पुणे-मुंबई मार्गावर सोमटणे येथे असलेला टोलनाका हटवण्यासाठी \’सोमटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हा महामार्ग बंद पडला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि मावळातील नागरिकांनी या आंदोलना सहभाग घेतला होता. यावेळी हा टोल हटवण्यासाठी घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी हा महामार्ग बंद केल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, कोणताही गैर प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. शनिवारपासून तळेगाव येथील विठ्ठल मंदिरात बेमुदत उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, आज आंदोलक आक्रमक झाले असून महामार्गावर कृती समितीचे सदस्य, नागरिक टोलनाका परिसरात जमा झाले आहेत. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Scroll to Top