सोलापूरजवळ अपघात
तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर रोडवरील तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ आज पहाटेच्या सुमारास मोठा अपघात झाला. या अपघातात तिघे जण ठार तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातात ठार झालेले तिघे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चास गावातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी जीपमधील जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Scroll to Top