मुंबई – आगामी शैक्षणिक वर्षांपासून स्कूल बसच्या शुल्कात वाढ होणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
बस गाड्यांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, वाहनांचे स्पेअर पार्ट्स, टायर आणि बॅटरीच्या दरात देखील 12 ते 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बसचा एकूण देखभालीचा खर्च वाढला आहे. इंधनाच्या खर्चात देखील वाढ झाली. कर्मचार्यांच्या पगारात देखील वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे स्कूल बस असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.