सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे-मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ ते २७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ एप्रिल रोजी उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार सकाळी ८ ते १०:३० या वेळेत प्रायश्चित्त – शांतीपाठ, गणेश पूजन, पुण्य वचन, नंदीश्राद्ध, आचार्य वरण, प्रकर्षशुद्धी, देवता स्थापना, अग्निस्थापन, नवग्रह स्थापना, दत्तमाला लघुपूर्णाहूती, आरती असे धार्मिक विधी होणार आहेत. दुपारी १ ते ३:३० महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वा भजने होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी २७ एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत शांतीपाठ, प्राकरशुध्दी, स्थापित देवतापूजन, श्री स्वामी समर्थ दत्तायाग, बलीदान पुर्णाहुती, अभिषेक, आरती होणार आहे. तसेच दुपारी १ ते ३:३० महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता भजने होणार आहेत. या दोन दिवसीय उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे (मर्डेवाडी) यांनी केले आहे.