मुंबई – ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून ऑर्डर मागवताना बऱ्याच सवलती मिळतात.त्यामुळे स्विगी हे घरोघरी लोकप्रिय अॅप बनले आहे. मात्र आता या प्लॅटफॉर्मवरून जेवण मागविणे थोडे महागात पडणार आहे. कारण स्विगी आता प्रत्येक ऑर्डरमागे २ रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारणार आहे.
स्विगी कंपनीकडे २.५ लाखांहून अधिक रेस्टॉरंटची नोंदणी आहे. तसेच महिन्याकाठी १० हजार हॉटेल आपली नोंदणी करतात. तसेच या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे. कंपनीने शुल्क आकारणीबाबत सांगितले की,स्विगीचे ग्राहक सध्या डिलिव्हरी शुल्क आणि कर देत असतात. पण डिलिव्हरी व्यावसाय तसा मंदीतच असल्याने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आणि खर्च भागविण्यासाठी कंपनीने शुल्क आकारण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्याची अंमलबजावणी मात्र गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. हे दोन रुपये शुल्क तसे कमीच असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पण स्विगीवर दररोज १५ लाखांहून अधिक ऑर्डर दिल्या जात असतात. हा भार इंस्टामार्ट युजर्ससाठी लागू नसल्याचे स्विगीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. स्विगीने हे अतिरिक्त शुल्क बंगळुरु आणि हैदराबाद सारख्या शहरात लागू केले आहे. सध्या तरी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात हे अतिरिक्त शुल्क लागू नाही.
‘स्विगी’ ऑनलाईन जेवणासाठीऑर्डरमागे २ रुपये शुल्क घेणार
