स्वीडनच्या हद्दीमध्ये घुसली रशियाची बॉम्बर विमाने !

मॉस्को- नाटो आणि रशियामधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत . रशियन बॉम्बर लढाऊ विमानांनी स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. रशियन एसयू- २४ बॉम्बरने बाल्टिक समुद्रातील गोटलँड या मोक्याच्या बेटाजवळ स्वीडिश हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. स्वीडिश एअर कॉम्बॅट कमांडने पहिल्यांदा रशियन विमानाला इशारा दिला, परंतु विमान आपल्या मार्गावरुन हटले नाही. या घटनेनंतर दोन स्वीडिश जेएएस-३९ ग्रिपेन फायटर प्लेनच्या मदतीने ते स्वीडिश एअरस्पेसमधून हटवण्यात आले.विशेष म्हणजे स्वीडनच्या हवाई क्षेत्राचे हे उल्लंघन स्वीडन नाटोचा सदस्य झाल्यानंतर केवळ तीन महिन्यांनी झाले आहे. स्वीडनचे हवाई दल प्रमुख जोनास विकमन यांनी सांगितले की, “रशियाची कृती अस्वीकार्य असून ती आमच्या देशाच्या अखंडतेचा आदर करत नाही.२०२२ मध्ये मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर स्वीडनने नाटो लष्करी आघाडीत सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.त्यावेळी रशियाने स्वीडिश हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते,जेव्हा स्वीडिश लढाऊ विमानांनी दोन एसयू-२४ आणि दोन एसयू-२७ लढाऊ विमानांना गॉटलँडवर रोखले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top