हरियाणाच्या काँग्रेस आमदाराचा मुलीसह भाजपात प्रवेश

चंदीगड

हरियाणामधील काँग्रेसच्या आमदार किरण चौधरी आणि त्यांच्या कन्या तथा माजी खासदार श्रुती चौधरी यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. हा पक्षप्रवेश दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झाला.

या प्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंह सैनी, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ हे उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर किरण चौधरी यांनी आपल्या मुलीसह भाजपा अध्यक्ष जे पी. नड्डा यांची भेट घेतली. किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल चौधरी यांच्या स्रुषा आहेत. त्या हरियाणाच्या तोशाम विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा आमदार राहिल्या आहेत. गेली ४० वर्षे त्या काँग्रेसमध्ये होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या श्रुती चौधरी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने त्या नाराज होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top