हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ ?
कोल्हापूर जिल्हा बँकेची चौकशी होणार

कोल्हापूर- माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीही चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. याबाबतची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज ट्विट करुनदिली.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिस्कसंदर्भात झालेल्या तक्रारी आणि त्याबाबत बँकेने दिलेली कागदपत्रेमध्ये स्पष्ट तपशील लेखापरीक्षण अहवालात नसल्याचा ठपका जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या अहवालात ठेवला आहे. त्यात आज या ट्विटद्वारे सोमय्या यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी डी. टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 39 हजार 53 शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली आहे का? या मुदत ठेवीच्या अनुषंगाने हसन मुश्रीफ परिवार, ब्रिस्क कंपनी आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे का? हसन मुश्रीफ यांच्या परिवाराशी संबंध असे ट्विटमध्ये किरीट सोमय्या म्हणाले आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला तसेच ब्रिस्क फॅसिलिटीज्‌‍‍ कंपनीला दिलेल्या कर्जासंबंधी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा आणि बँकेचा संबंध आहेत का ? या तीन बाबींचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या आदेशामुळे आता हसन मुश्रीफ अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात ईडीने केलेल्या कारवाईबाबत किरीट सोमय्या यांनी 8 फेब्रुवारी 2023 रोजी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. यामध्ये 39 हजार 53 शेतकर्यांच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपये मुदतठेव विशिष्ट काळासाठी घेण्यात आली आहे. त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या सर्व तक्रारींची आणि कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेला भेट दिली होती.

Scroll to Top