केलामॉस्को – उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा बळी गेला. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी हाथरस दुर्घटनेवर पाठविलेल्या शोकसंदेशात दुःख व्यक्त केले आहे.पुतीन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक संदेश पाठवला. हाथरसच्या घटनेचे आपल्याला खूप दुःख झाले,असे पुतीन यांनी संदेशात म्हटले. जपानचे पंतप्रधान किशिदा परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर शोकसंदेश पोस्ट केला. मी जपान सरकारच्या वतीने हाथरस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो,असा संदेश किशिदा यांनी पोस्ट केला.
